अभय पाटील
बोर्ली पंचतन : जगद्गुरु नरेंद्रमहाराज संस्थान यांच्यावतीने दरवर्षी रक्तदान महायज्ञ आयोजित करण्यात येते. यावर्षीही 4 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 अखेर या रक्तदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज शिबीर आयोजित करण्यात आले.
यावेळी जगद्गुरु नरेंद्रमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुर भाटीवाल तसेच श्रीवर्धन भंडारी समाज संघटनेचे सचिव विश्वास तोडणकर यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी अमित पाटील, डॉ. तात्याराव टरफले, डॉ. किशोर कोठुले, आरोग्य सेविका सुजाता पाटील-धनावडे, ऋतुजा काळे, पत्रकार अभय पाटील तसेच नरेंद्र महाराज संस्थांचे श्रीवर्धन तालुक्यातील युवा टीम व भक्तगण मोठया संख्याने उपस्थित होते.
आपल्या महाराष्ट्रात सिकलसेल, ऍनिमिया, हिमोफिलिया, थॅलिसेमिआ, ब्लड कॅन्सर, किडनी विकार रुग्ण जास्त आढळतात. तसेच इतर रुग्णांना रक्ताची नितांत गरज लागते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्याना रक्त बाटल्या देण्याचे कार्य जगद्गुरु नरेंद्रमहाराज संस्थान यांच्यावतीने दरवर्षी रक्तदान महायज्ञ आयोजित करण्यात येते. दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या या रक्तदान शिबिरास बोर्ली पंचतनमध्ये देखील उत्तम प्रतिसाद मिळाला असून यावेळी सुमारे 200 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
