• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेणमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या

ByEditor

Jan 11, 2025

विनायक पाटील
पेण:
रायगड जिल्ह्यातील पेण शहरात रहाणाऱ्या 14 वर्षीय लहानग्या मुलाची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत आंबेडकर शाळे लगतच्या झुडूपात मृतदेह मिळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

गणेश बाळू चुणारे (वय 14) असे मृत मुलाचे नाव आहे. मृत मुलाचे वडील बाळू चुणारे यांनी याबाबत पेण पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. अज्ञात आरोपीविरोधात कलम 103 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेण पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!