प्रतिनिधी
नागोठणे : येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात रविवार, दि. १२ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्यावर भाष्य करताना त्यांनी धर्मनिरपेक्ष समाजाची निर्मिती करण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांना दिली, यामुळे कल्याणकारी शासनाचा कार्यभारात शेतकऱ्यांना व स्त्रीयांना सन्मानाने वागवले जात असे हे सांगितले. डॉ. विलास जाधवर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील आधारित शासकीय ग्रंथांचे वाचन करून वाचन संकल्प महाराष्ट्राचा या पंधरवड्याचा हे कार्यक्रम दरवर्षी शासनाने ठेवले पाहिजे असे प्रतिपादन केले.
प्रा. डॉ. विजय चव्हाण, प्रा. हेमंत जाधव, विकास नरवडे, दिपक दाभाडे यांची कार्यक्रमास उपस्थिती होती. शेवटी प्रा. हेमंत जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सभा संपली.
