• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिकारीकरिता गेला…बंदूक हातातून पडली…बंदुकीतुन गोळी सुटल्याने स्वतःचीच शिकार झाली…

ByEditor

Jan 13, 2025

32 वर्षीय इसमाचा मृत्यू; पाणोसे आदिवासीवाडीतील घटना

मयत इसमावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सलीम शेख
माणगाव :
बेकायदेशीर ठासणीची बंदूक बाळगून शिकारी करता गेलेल्या इसमाची बंदूक हातातून पडून त्याच्याच उजव्या बाजूच्या नितंबावर गोळी लागून तो गंभीर स्वरूपाचा जखमी होऊन त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना ता. ११ जाने. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील मौजे कवळीचा माळ येथील जंगलभागात पाणोसे आदिवासीवाडी येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तातडीने दाखल झाले. याप्रकरणी सदर मयत इसमावर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून माणगाव तालुक्यात आणखी अवैध शस्त्र, ठासणीच्या बंदूका किती आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाणोसे आदिवासी वाडी जवळील मौजे कवळीचा माळ येथील जंगल भागात सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पाणोसे आदिवासी वाडीतील मयत मधुकर सखाराम वाघमारे (वय ३२) हा त्याच्या ताब्यातील ठासणीची बंदुक शिकारी करीता बेकायदेशीरपणे बाळगुन झाडावर गेला होता. तो झाडावरुन खाली उतरत असताना, त्याच्या ताब्यातील बंदुक निष्काळजीपणे व हयगयीने आरोपीच्या हातुन खाली जमिनीवर पडली असता तीचा फायर होवुन बंदुकीतुन गोळी सुटुन आरोपीच्या उजव्या बाजुच्या नितंबावर गोळी लागुन तो गंभीर स्वरूपाचा जखमी होवुन त्याचा मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्यात पाणोसे आदिवासी वाडीतील संजय नथु कोळी यांनी दिली असून माणगाव पोलिसांनी मयत आरोपी याच्या विरोधात गु.र.नं.10/2025 भा.दं.वि.क. 106, 106(1),125 (b),3 (1), 25, शस्त्र अधिनियम, 1959 चे कलम 3(1), 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज भोसले हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!