• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण येथे मोटार सायकल हेल्मेट रॅली संपन्न

ByEditor

Jan 15, 2025

अनंत नारंगीकर
उरण :
सुरक्षा सप्ताहानिमित्त प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार व सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे, हरीभाऊ जेजुरकर, कार्यालय पनवेल यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. १५) उरण येथे वाहन चालक व वाहन मालकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी केअर पाॅईंट हाॅस्पिटल ते उरण चारफाटा अशी मोटारसायकल हेल्मेट रॅली काढण्यात आली.

या रॅलीचे सुरुवातीला वाहनचालकांनी वाहन चालविताना कोणती काळजी घ्यायची याबाबत माहिती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. त्याप्रमाणे उपस्थित वाहनचालक व परिवहन विभागातील अधिकारी यांनी संयुक्तपणे प्रतीज्ञा घेतली. या रॅलीमध्ये साधारण ७० ते ७५ महिला व पुरुष मोटारसायकल स्वार व मोटार ट्रेनिंग स्कूलच्या वाहनांनी सहभाग घेतला होता.

यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथील मोटार वाहन निरीक्षक दिपक भोंडे, राकेश रावते, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भाऊसाहेब कदम तसेच उरण येथील श्री एकवीरा मोटार ट्रेनिंग स्कूलचे संचालक बळीराम ठाकुर, उरण मोटार ट्रेनिंग स्कूलचे दानिश मुकरी, हरी हरेश्वर मोटार ट्रेनिंग स्कूलचे जितेंद्र प्रधान, गणेश मोटार ट्रेनिंग स्कूलचे गणेश भोईर, राघोबा मोटार ट्रेनिंग स्कूलचे प्रितम पाटील तसेच उरण येथील वाहन चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!