प्रतिनिधी
नागोठणे : येथील को. ए. सो. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व निरंतर शिक्षण व विस्तार विभागातर्फे मतदार जनजागृती दिनाच्या निमित्ताने मा. जिल्हाधिकारी कार्यालयांच्या नियमावलीनुसार निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन, पथनाट्य व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील रांगोळी स्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. दिनेश भगत यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे व डॉ. मनोहर शिरसाठ, निरंतर शिक्षण व अध्ययन प्रमुख डॉ. राणी ठाकरे, आय. क्यु. ए. सी. समन्वयक डॉ. संदेश गुरव, डॉ. विलास जाधवर, चैत्राली पाटील आदींसह विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर स्पर्धेत १८ रांगोळी काढण्यात आल्या. प्रथम क्रमांक कु. भूमी राव, कु. वैष्णवी शिंदे, कु. सिद्धी राजिवले, द्वितीय क्रमांक कु. पुजा ठाकूर व कु. लावण्या पाटील, तृतीय क्रमांक कु. अर्पिता देशमुख, कु. स्वरांगी कोलाडकर व कु. सलोनी सिंग व दोन गटांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले. रांगोळी स्पर्धांचे परिक्षण प्रा. चैत्राली पाटील व डॉ. राणी ठाकरे यांनी केले. सदर स्पर्धेत एकूण ५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
