प्रतिनिधी
नागोठणे : येथील को. ए. सो. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय नागोठणेची तृतीय वर्ष बी. एस्सी.ची कु. समृद्धी मोटे हिने राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत कास्य पदक जिंकले आहे. यानिमित्ताने रायगड झोनमधून पुढे जाऊन मुंबई विद्यापीठाचे तीला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणरे, माणगाव जि. रायगड येथे पार पडलेल्या १७व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय अविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाने सलग सहाव्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली आहे. यात को. ए. सो. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या कु. समृद्धी मोते हीला कास्य पदकाने गौरवण्यात आले. रायगड जिल्ह्यातून राज्यस्तरीय स्पर्धेत पोहोचून तिने मिळवलेले यश हे महाविद्यालयासाठी व संस्थेसाठी कौतुकास्पद आहे. तिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल समृद्धी मोते व तिचे मार्गदर्शक शिक्षक आक्रोश पाटील व डॉ. स्मिता मोरबाले यांचे रायगड जिल्ह्यातून सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ पाटील, कार्यवाह ॲड. पल्लवी पाटील, वरिष्ठ मार्गदर्शक संजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक खोपकर, सहाय्यक कार्यकारी अधिकारी अनिता पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी कौतुकाची थाप दिली. तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. दिनेश भगत, डॉ. संदेश गुरव, प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे व संपूर्ण अविष्कार संशोधन टीमचे अभिनंदन केले आहे.
