क्रीडा प्रतिनिधी
रायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आंतरजिल्हा टी-२० निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याच्या महिलांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. संघाचे कर्णधारपद गार्गी साळुंके हिच्याकडे तर उपकर्णधार म्हणून वैभवी कुळकर्णी हिची निवड करण्यात आली आहे.
रायगड महिला संघ पुढीलप्रमाणे :
गार्गी साळुंके (कर्णधार), वैभवी कुळकर्णी (उपकर्णधार), रोशनी पारधी, साची बेलोसे, अनिषा कांबळे, अपर्णा सिंग, तनिष्का वार्गे, आर्या पाटील, निशिता विठलानी, काजल साळुंके, ईश्वरी खत्री, अमिषा बामणे, आर्या शेंडगे, अपर्णा गायकवाड
राखीव खेळाडू : श्रुती अडीत, मनीषा भारद्वाज, अपेक्षा पवार, समिधा तांडेल, वेदश्री शेळके, शुभांगी दास, वेदिका तेटागुळे, अनिष्का वर्मा
हा संघ एमसीएच्या टी-२० स्पर्धेत पुणे येथे सहभागी होणार आहे. संघाला आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सचिव प्रदिप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
