आंतरमहाविद्यालयीन वॉटर पोलो स्पर्धेत सुवर्णपदक
प्रतिनिधी
नागोठणे : मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन वॉटर पोलोच्या स्पर्धा दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी प्रगती महाविद्यालय, डोंबिवली येथे पार पडल्या. या वॉटर पोलो स्पर्धेत नागोठणे येथील कोएसोच्या आनंदीबाई प्रधान महाविद्यालयाने प्रतिस्पर्धी महाविद्यालयाचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले आहे. सदर स्पर्धेसाठी महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता.

या संघाचा कप्तान म्हणून एम. एस्सी. द्वितीय वर्षातील विद्यार्थी कु. मृणाल पाटील याने नेतृत्व केले. तसेच या स्पर्धेतून विद्यापीठाच्या संघासाठी निवड चाचणी घेण्यात आली. त्यामधून महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. सदर स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख प्रा. डॉ. विलास जाधवर यांनी टीम मॅनेजर म्हणून काम पाहिले.
त्यांच्या या यशाबद्दल कोएसोचे अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ संजय पाटील, कार्यवाह ॲड. पल्लवी सिद्धार्थ पाटील, जेष्ठ संचालक संजय दत्ता पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक खोपकर, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता पाटील व प्रशासन अधिकारी सुरेंद्र दातार व अन्य पदाधिकारी तसेच महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य नरेंद्रशेठ जैन, अनिलशेठ काळे, ॲड. सोनल जैन, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. दिनेश भगत व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
