• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जसखार गावात राहत्या घराला आग, घरमालकाचे लाखोंचे नुकसान

ByEditor

Jan 21, 2025

अनंत नारंगीकर
उरण :
जसखार गावात मनोज चंद्रकांत भोईर यांच्या राहत्या घराला आग लागण्याची घटना मंगळवारी (दि. २१) दुपारच्या सत्रात (१२-४० वा.) घडली आहे. घरात कोणीही नसल्याने घरातील महिला, मुले थोडक्यात बचावली आहेत. सदर आगीची माहिती गावातील रहिवाशांकडून सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आग ही शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असे तपासात पुढे येत असले तरी घरातील पैसे, मौल्यवान वस्तू, दागिने, फ्रिज, टिव्हीसह इतर जीवनावश्यक वस्तू जळून नष्ट झाल्या आहेत.

जसखार गावातील रहिवासी मनोज चंद्रकांत भोईर हे मंगळवारी (दि. २१) नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. त्याची पत्नी ही बाजूला सुरु असलेल्या त्यांच्या नव्या घराच्या बांधकामा ठिकाणी आपल्या राहत्या घराचा दरवाजा बंद करून गेली होती. त्यावेळी दुपारच्या सत्रात त्या राहत असलेल्या घराला आग लागण्याची बातमी तसेच रहिवाशांचा आरडाओरड सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. रहिवाशांनी प्रसंग सावधगिरी बाळगून सदर घटनेची माहिती सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र घरात कोणीही नसल्याने घरातील माणसे थोडक्यात बचावली आहेत. सदर आग ही शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेची माहिती उरण पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी संतोषसिंग डाबेराव, सरपंच काशिबाई ठाकूर, ग्रामविकास अधिकारी रुपम गावंड, तलाठी ज्योती भालचिन यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामे सुरू केले आहे. घरमालक मनोज चंद्रकांत भोईर यांच्या म्हणण्यानुसार नव्या घराच्या बांधकामासाठी आणलेली रोख रक्कम ५० हजार, घरातील इतर असणारे पैसे, मौल्यवान वस्तू दागिने फ्रिज, टिव्ही संच तसेच जीवनावश्यक वस्तू जळून नष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!