घन:श्याम कडू
उरण : उरण एसटी डेपोमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एसटी भाडेवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन करत चक्का जाम केला. शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ही भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे.
एसटी बसच्या तिकीट दरात १५ टक्के वाढ करून सर्वसामान्यांना खिसा कापणाऱ्या महायुती सरकारला दणका देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज २८ जानेवारीला राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आला आहे. आज शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत चक्का जाम आंदोलन केले. उरण एसटी डेपो येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एसटी भाडेवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन करत चक्का जाम केला. शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ही भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. उरणमधील एसटी डेपोजवळ मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी भाडेवाढीच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. शिवसैनिक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. यावेळी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. जर सरकारने भाडेवाढ रद्द केली नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. “जनतेवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. एसटी भाडेवाढ रद्द करण्याबाबत सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एसटीच्या तिकीट दरवाढीवरून महायुती सरकारच्या विरोधात सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. या दरवाढीचे सुरुवातीला समर्थन करणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एकदम यु टर्न घेतला आहे. या दरवाढीची मला कल्पनाच नव्हती. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे भाडेवाढ झाली, असे सांगत प्रताप सरनाईक यांनी हात वरती केले आहेत. भाडेवाढ संदर्भात महायुतीचे सरकार काय निर्णय घेते याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी एसटी आगारप्रमुखाला निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, संपर्क प्रमुख दीपक भोईर, सूर्यकांत दरणे, महेंद्र पाटील, रुपेश पाटील, एस. के. पुरो, अविनाश म्हात्रे, ममता पाटील, मनीषा ठाकूर, अमिता थळी, सुभाष तांडेल आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मात्र काही पदाधिकारी हे अशा कार्यक्रमात दिसत नसल्याने शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्थित रहाण्याची मागणी केली.