• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विद्यार्थ्यांनी लाल दिव्याच्या गाडीचे स्वप्न पाहावे -विनोद पाटील

ByEditor

Jan 28, 2025

प्रतिनिधी
नागोठणे :
येथील कोएसो आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय, नागोठणे येथे आज रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त पोलीस वाहतूक पथकाने महाविद्यालयास भेट दिली. तेव्हा नागोठणे पोलीस ठाण्याचे विनोद पाटील यांनी विद्यार्थी वर्गास मार्गदर्शन करतांना वाहतूकीचे नियम विद्यार्थ्यांना सांगितले. हेल्मेट वापरणे, वाहन परवाना, वाहानाचे कागदपत्रे, गाडीचा विमा आदी कागदपत्रे गाडी चालवताना सोबत असावे ही आशा व्यक्त केली.

याप्रसंगी श्री. घासे यांनी विविध चिन्हांच्या वापराबद्दल माहिती सांगितली. तसेच यावेळी त्यांनी मुलांना प्रश्न विचारले. त्या विद्यार्थ्यांनी समाधान कारक उत्तरे दिली. त्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस दिले. या कार्यक्रमाचे औचित्य साधत वाहतूक पोलिसांवर हवालदार श्री. घासे व श्री. विनोद पाटील यांनी सेवेची २२ वर्षे पूर्ण केले त्याबद्दल त्यांचा माजी प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना विनोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पहा. आयएएस, आयपीएस सारख्या परीक्षांना विद्यार्थ्यांनी प्राधान्य द्यावे, जेणेकरून तुम्ही आमच्या समोर लाल दिव्याच्या गाडीत फिरतांना दिसतील, ही इच्छा विद्यार्थ्यांकडे व्यक्त केली.

डॉ. संदेश गुरव सरांनी वाहन परवाना काढण्यासाठी शाळा, महाविद्यालय येथे उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे ही आशा व्यक्त केली. सदर कार्यक्रमास फौजदार आर, डी, नागदिवे, प्रा. डॉ. विजय चव्हाण यांच्यासह श्री. पाटील, श्री. घासे, श्री. फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम प्र. प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे व डॉ. मनोहर शिरसाठ यांनी राबवला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी सामूहिक रस्ता सुरक्षा नियमावली शपथ घेतली व कार्यक्रम सांगता झाली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!