• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कुष्ठरुग्ण शोध मोहिम अंतर्गत ‘कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन

ByEditor

Jan 28, 2025

अलिबाग : दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी मा. सहाय्यक संचालक, संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) रायगड व माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा परिषदेसमोर “कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आली. हि स्पर्धा उत्स्फूर्त स्पर्धक व नागरिकांच्या विविध सामाजिक संस्था यांच्या उपस्थितीत पार पडली. कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात हि सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पुजन करुन सर्व उपस्थितांच्या समवेत कुष्ठरोग निर्मूलन व जनजागृतीबाबत प्रतिज्ञा घेवून सकाळी ७ वा सुरु झाली. सदर स्पर्धेत १३१ स्पर्धक सहभागी होते. हि स्पर्धा संपूर्ण अलिबाग शहरांत ३ किमी अंतरात घेण्यात आली. स्पर्धेत मुलांसोबत मुलीदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे या स्पर्धेच्या पारितोषिकांची रक्कम विभागून देण्यात आली.

स्पर्धेत विजेते स्पर्धक (मुले)

प्रथम क्रमांक : कु. रामू गणपत पारधी (रक्कम रु.४,०००/-).

व्दितीय क्रमांक : कु. चिंतामण मारुती शिंगवा (रक्कम रु.२,५००/-)

तृतीय क्रमांत : कु. स्वागत समिर पाटील (रक्कम रु.१,५००/-)

विजेते स्पर्धक (मुली)

प्रथम क्रमांक : कु. ऋतुजा जयवंत सकपाळ (रकम रु.४,०००/-)

व्दितीय क्रमांक : कु कथा अतुल वाडकर (रक्कम रु. २,५००/-)

तृतीय क्रमांत : कु. प्राजक्ता परशराम शिंदे (रक्कम रु. १,५००/-)

वरील विजेत्या स्पर्धकांचा प्रशस्ती पत्रके व ट्रॉफी देवून गौरव करण्यात आला, स्पर्धकांची बक्षिसाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. स्पर्धेत सहभागी इतर सर्व स्पर्धकांना देखील प्रशस्ती पत्रके वाटप करण्यात आले. तसेच, स्पर्धेनंतर सर्व स्पर्धक, आयोजक व सहकाऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला.

या स्पर्धेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन संकपाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षयराज राठोड, माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, रायगड मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. निशिगंध आठवले, सेक्रेटरी डॉ. चांदोरकर, खजिनदार नवलकिशोर साबु, लायन्स डायमंड अध्यक्ष डॉ. रेखा म्हात्रे, जे.एस.एस अध्यक्ष डॉ. नितिन गांधी, लायन्स क्लब श्रीबाग अध्यक्ष अॅड के. डी. पाटील, रायगड पोलीस क्रीडा प्रमुख ऋषिकेश साखरकर, तेजस्विनी फाउंडेशन संस्थापिका जिविता पाटील, विश्वस्पर्धा अकॅडमी तपस्वी गोंधळी, यतिराज पाटील, जेएसएम कॉलेजचे गुरव, वाहतूक उपनिरिक्षक काळोखे, चेंढरे पोलिस पाटील विकास पाटील, अवैद्यकीय सहाय्यक भगवान जाधव, वरिष्ठ लिपिक प्रीती पाटील, क. लिपिक पी. तेजस मोरे, इतर सामजिक कार्यकर्ते, मान्यवर व सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. डॉ. राजाराम हुलवान यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.

स्पर्धेची सांगता करताना सहाय्यक संचालक डॉ. प्राची नेहूलकर यांनी सर्व स्पर्धक, नागरिकांना कुष्ठरोगाबाबत माहिती दिली व कुष्ठरोगाबाबतची घोषणा देवून स्पर्धा समाप्त केली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!