अलिबाग येथे भव्य सहकार दिंडी व सहकार परिषदेचे आयोजन
अमुलकुमार जैन
रायगड : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भविष्यातही सहकारी संस्थांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील.देशात जिल्हा बँक अग्रेसर म्हणून काम करीत असताना जिल्ह्यातील सहकाराला दिशा देण्याचे काम बँक प्रभावीपणे करण्यास कटीबद्ध आहे असे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी सहकार दिंडीच्या सांगता समारंभात जिल्हा बँकेच्या योगदानाचा आढावा घेतानाना जिल्हा बँकेच्या सभागृहात सांगितले.
रायगड जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्यावतीने आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या सहकार्याने अलिबाग येथे भव्य सहकार दिंडी, शोभायात्रा आणि जिल्हा सहकार परिषद आयोजित करण्यात आली. सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सहकाराचे सामाजिक आणि आर्थिक योगदान अधोरेखित करण्यात आले.

सहकार दिंडीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. त्यानंतर ही दिंडी महावीर चौक, बालाजी नाका आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे अभिवादन करत सरखेल कान्होजी आंग्रे समाधीपासून ठीकरूळ नाका, आदर्श सहकारी पतसंस्था मार्गे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात पोहोचली. या कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी, कोकण विभाग फेडरेशन अध्यक्ष गिरीश तुळपुळे, कमळ पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार चाळके, माजी अध्यक्ष सतीश पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक परेश देशमुख, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, जिल्हा फेडरेशन अध्यक्ष अॅड. जे. टी. पाटील, आदर्श सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील, अध्यक्ष अभिजित पाटील, कै. दत्ता पाटील क्रेडिट को. ऑप पतसंस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, एकविरा पतसंस्था नवगाव अध्यक्ष प्रमोद घासे, तालुका सहनिबंधक श्रीकांत पाटील, महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, सहयोग नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन योगेश मगर तसेच विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, व्यवस्थापक आणि कर्मचारी अशा तब्ब्ल 1000 पेक्षा अधिक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.
तालुका सहनिबंधक श्रीकांत पाटील यांनी आपल्या भाषणात सहकार क्षेत्रातील तीन रंगांचे महत्व स्पष्ट केले. लाल रंग – सहकार क्षेत्राचे प्रतिनिधित्व, निळा रंग – आर्थिक व्यवस्थेचे प्रतीक, हिरवा रंग – पर्यावरण संवर्धनाचे प्रतीक याच पार्श्वभूमीवर सहकार शिक्षणावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहकार चळवळ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न केला जाईल.
सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी यांनी भारतातील सहकार चळवळीचे जागतिक योगदान अधोरेखित करत प्लास्टिक मुक्त पर्यावरण चळवळ सहकाराच्या माध्यमातून उभी करण्याचे आवाहन केले.
कोकण विभाग फेडरेशन अध्यक्ष गिरीश तुळपुळे यांनी कोकणातील सहकारी पतसंस्थांच्या वाढत्या विश्वासार्हतेबद्दल चर्चा केली. त्यांनी सांगितले की, ग्राहकांचा सहकार क्षेत्रावर वाढता विश्वास आणि संस्थांची आर्थिक स्थिरता यामुळे कोकणातील सहकारी संस्थांना अधिक बळकटी मिळत आहे. महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांनीही रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. त्यांनी सहकारी संस्थांना जिल्हा सहकारी बँकेच्या कार्यपद्धतीचे अनुकरण करण्याचे आवाहन करत सहकार क्षेत्राच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा सहकार परिषदेत विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, व्यवस्थापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने सहकार क्षेत्राचा सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि सहकार दृढ करणे हा उद्देश असल्याचे तालुका सहनिबंधक श्रीकांत पाटील यांनी स्पष्ट केले. सहकार क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकारी संस्थांनी एकत्र येऊन नव्या वाटचालीचा संकल्प सोडला. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत करून बँकेमुळे भविष्यात सहकार चळवळीला आणखी बळकटी मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला
Write more, thats all I have to say. Literally, it seems as though you relied on the video to make your point.
You definitely know what youre talking about, why throw away your intelligence
on just posting videos to your weblog when you could be giving us something informative to
read?
Hi there, this weekend is fastidious in favor of me, for the reason that this point in time i am reading this great educational paragraph here at my home.
What’s up to all, how is all, I think every one is getting more from this site,
and your views are nice in support of new viewers.
Good day! This is kind of off topic but I need
some guidance from an established blog. Is it difficult to set up your own blog?
I’m not very techincal but I can figure things out pretty
quick. I’m thinking about setting up my own but I’m not sure where to begin. Do you have any points or suggestions?
Appreciate it
Hello, i feel that i saw you visited my weblog thus i
got here to return the desire?.I am attempting to to find things
to enhance my website!I assume its good enough to
make use of a few of your ideas!!
It’s remarkable for me to have a web page, which is beneficial designed
for my experience. thanks admin
You could definitely see your skills in the
work you write. The arena hopes for more passionate writers such as you who are not afraid to say how they believe.
All the time go after your heart.
I am not sure where you are getting your information, but good topic.
I needs to spend some time learning much more or understanding more.
Thanks for magnificent information I was looking for this information for my mission.
Wow, marvelous weblog structure! How lengthy have you ever been running a blog for?
you make running a blog look easy. The whole glance of your web site is fantastic, as neatly as the content material!
Today, I went to the beachfront with my children. I found a sea shell and gave it to my 4 year old daughter and
said “You can hear the ocean if you put this to your ear.” She put the shell
to her ear and screamed. There was a hermit crab inside and it pinched her ear.
She never wants to go back! LoL I know this is completely off topic but I had to tell someone!
Hello my family member! I wish to say that this
post is amazing, great written and include approximately all important infos.
I’d like to see extra posts like this .