वैशाली कडू
उरण : नवीन शेवा ग्रामपंचायतच्या हद्दीतील पिण्याचे पाण्याचे बिल ३१,८०,४८५ रुपये इतकं बाकी होतं. आज शुक्रवार, दि. २८ जुलै २०२३ रोजी ग्रामसुधारणा मंडळ नवीन शेवा व ग्रामपंचायत नवीन शेवा यांच्या माध्यमातून माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रक्कम चेकच्या स्वरूपात एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील व सल्लागार चंद्रकांत घरत यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले तर सरपंच सोनल घरत यांनी आभार मानले. यावेळी उपसरपंच कुंदन भोईर, ग्रामसंधारणा मंडळाचे सल्लागार एकनाथ घरत, बाळकृष्ण पाटील, उपाध्यक्ष मयूर म्हात्रे, एल. जी. म्हात्रे, सेक्रेटरी शेखर पडते, खजिनदार भारत भोईर, ग्रामपंचायत सदस्य मयुरी घरत, रेखा म्हात्रे, भुपेंद्र पाटील, भावना भोईर, अशोक दरणे, प्रणिता भोईर, वैशाली म्हात्रे, महिला आघाडीच्या वैशाली सुतार, मनीषा घरत, ग्रामसुधारणा मंडळाचे सदस्य शैलेश भोईर, के. एम. घरत, गणेश म्हात्रे, अशोक म्हात्रे, सुरेश पाटील, निलेश घरत, तंटामुक्तीचे अध्यक्ष हेमंत म्हात्रे, पोलीस पाटील मनोहर सुतार व ग्रामस्थ उपस्थित होते.