• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

हरवलेले मोबाईल, दागिने मिळवून दिले परत; माणगांव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

ByEditor

Jul 28, 2023

सलीम शेख
माणगाव :
सध्याचे युगात मोबाईल वापर करणा-यांची संख्या जास्त वाढली असुन मोबाईल हे दैनंदीन वापरातील महत्वाचे उपकरण आहे. त्यामुळे मोबाईल चोरीला जाणे हरवणे याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. मोबाईल चोरीला जाणे, हरवणे यामध्ये तकादार यांचे नुसते आर्थीक नुकसान नसुन मोबाईल मधील महत्वाचे डॉक्युमेट फाईल, फोटो, याची देखील हानी होते. माणगांव पोलिसांनी दमदार कामगिरी करत हरविलेले मोबाईल परत मिळवून दिले आहेत.

माणगांव पोलीस ठाणे अंतर्गत मोबाईल मिसिंग दाखल होत्या. त्याचा तपास करून रायगड पोलीस विभागाकडून सदरचे मोबाईल संबधीतांना मिळवुन देणे करीता पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकरी नितीनकुमार पोंदकुले यांच्या आदेशाने माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व पोलीस तपास पथक माणगांव पोलीस ठाणे यांनी माणगाव पोलीस ठाणेतील दाखल गहाळ मालमत्ता मधील १३ मोबाईलचा शोध घेवुन सबंधीत फिर्यादी यांना पोलीस ठाणेत बोलावुन दि. २८ जुलै रोजी उपविभागीय पोलीस अधिकरी नितीनकुमार पोंदकुले तसेच पो. नि. राजेंद्र पाटील यांचे हस्ते देण्यात आले. सदर कामीगरीमध्ये पोशि मुंडे यांची मोलाची कामगीरी आहे. तसेच रवाळजे येथून चोरीला गेलेले दागिने सुद्धा माणगांव पोलिसांनी तपास करून संबंधित मालकाला परत केले आहेत. यावेळी उपविभागीय अधिकारी माणगांव नितीनकुमार पोंदकुळे, पो. नि. राजेंद्र पाटील, स. पो. नि. सतिश आस्वर, पो. उपनिरीक्षक किर्तीकुमार गायकवाड, स. फौ. सूर्यकांत भोजकर, पो. शि. राम डोईफोडे, नाथा दहिफळे, रावसाहेब कोळेकर, पोंदे, रेश्मा वजरकर, प्रीती ओमले, मुंडे आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!