• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अलिबाग रेवस मार्गावर भाल गावाजवळ दुचाकीचा अपघात, दोघे जखमी

ByEditor

Jul 29, 2023

पिंट्या गायकवाड मित्रमंडळ रुग्णवाहिकेसह आले मदतीला

अमूलकुमार जैन
अलिबाग:
अलिबाग रेवस मार्गावर भाल गावाजवळ रस्त्यातील खड्डा चुकविताना रस्त्यावर पडलेल्या खडीवरून घसरल्यामुळे दुचाकीसह रस्त्याच्या कडेला पडून अपघात झाला. यावेळी दुचाकीवरून प्रवास करणारे दोघेजण गंभीर जखमी झाले.

अपघातात जखमी झालेले दोघेही परप्रांतीय कामगार (नाव समजू शकली नाही) असून अलिबाग रेवस मार्गावर प्रवास करताना रस्त्यातील खड्डा चुकविताना रस्त्यावर पडलेल्या खडीवरून घसरल्यामुळे दुचाकीसह रस्त्याच्या कडेला पडून अपघात झाला. सदर अपघाताची माहिती दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य राज्याध्यक्ष साईनाथ पवार यांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्ते व किहीम ग्रामपंचायत सदस्य पिंट्या गायकवाड यांना दिली. त्याचक्षणी पिंट्या गायकवाड यांनी ताबडतोब आपल्या मित्रमंडळासह रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी जात गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या दोघांना आपल्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

संकटकाळी मदतीला नेहमीच तत्पर धावून येणारे पिंट्या गायकवाड व मित्रमंडळाचे अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना तात्काळ मदत केल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!