• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

म्हसळा तालुक्यात महिलेचा विनयभंग

ByEditor

Feb 8, 2025

म्हसळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अमुलकुमार जैन
रायगड :
जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात असणारी पीडित महिला ही तिचे शासकीय काम संपवून घरी परतत असताना दिनांक 6/02/2025 रोजी सायंकाळी 4:30 वा. त्यांचे स्कुटीवरुन कणघर येथे जात असताना त्यांना त्यांचे पती यांचा फोन आल्याने त्या त्यांची गाडी रस्त्याचे बाजूला उभी करुन फोनवर बोलत असताना आरेापी मुबशीर शेख (रा. पांगळोली, ता.म्हसळा) याने त्याचे सफेद रंगाचे बुलेट मोटरसायकलवर एका इसमास बसवुन तेथे येउन त्याने त्याची बुलेट मोटारसायकल फिर्यादी यांचे स्कुटीजवळ उभी करुन फिर्यादी यांचेकडे वाईट नजरेने बघुन त्याने त्याचे हाताने अंगठ्याचा वाईट इशारा करुन फिर्यादी यांचे मनास लज्जा उत्पन्न केली.

याबाबत म्हसळा पोलीस ठाण्यात 6 फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असून म्हसळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली बी. जे. बोंगाणे अधिक तपास करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!