• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कर्नाळा खिंडीत भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

ByEditor

Feb 9, 2025

पनवेल : मुंबई-गोवा मार्गावरील कर्नाळा खिंडीत भीषण अपघात झाल्याची घटना आज रविवार (दि.9) रोजी घडली आहे. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर कारमध्ये असलेल्या पल्लवी जोशी ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कारमध्ये असलेल्या पल्लवी जोशी या कार मालक ड्रायव्हर जगदीश हाजरा यांच्या सोबत ठाण्याहून वडखळकडे जात होत्या. कारचालक कर्नाळा खिंडीत आले असता भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने गाडीला जोरदार धडक दिली या धडकेत कंटेनर कार वरच पलटी झाला. त्यात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, चालक जगदीश हाजरा यांचा कंटेनर खाली दबून मृत्यू झाला आहे. तर पल्लवी जोशी या गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना गाडीबाहेर काढले. हायड्राच्या सहाय्याने गाडीवरील पलटलेला कंटेनर बाजूला काढण्यात आला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!