• Sat. Jul 12th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

संतापजनक! जन्मदात्याकडूनच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

ByEditor

Feb 14, 2025

प्रतिनिधी
पनवेल :
पनवेलमध्ये बापानेच आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नराधम बापाने आधी मुलीवर लैंगिक अत्याचार केले त्यानंतर 100 रुपये देऊन तिला गप्प राहण्यास सांगितले. या घटनेमुळे पनवेलमध्ये खळबळ उडाली आहे. पनवेल शहर पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बापानेच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पनवेल परिसरात घडली. याप्रकरणी नराधम बापाविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने आपल्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर मुलीने गप्प राहावे आणि हे प्रकरण कोणालाही सांगू नये म्हणून बापाने मुलीला 100 रुपये देऊन हा प्रकार कुठे सांगू नको असे सांगितले. पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला असता बाप असल्याने याबाबत कुठेही वाच्यता करण्यात आली नाही. 2 दिवसांनी पीडित मुलीला घेऊन तिच्या आईने पनवेल शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. आईच्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक सारिका झांजुर या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!