• Sun. Jul 13th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माजी आमदार मधुकर (पप्पा) ठाकूर स्मृतीचषक स्पर्धेत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ किहीम यांनी पटकावला द्वितीय क्रमांक

ByEditor

Feb 14, 2025

अब्दुल सोगावकर
सोगाव :
अलिबाग शहरातील क्रीडाभुवन मैदानावर कुबेर इलेव्हन आयोजित माजी आमदार मधुशेठ ठाकूर (पप्पा) यांच्या स्मरणार्थ मधुशेठ ठाकूर स्मृती चषक २०२५ भव्य नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धा शनिवार, दि. ८ आणि रविवार, दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी असे दोन रात्री आयोजित करण्यात आली होती. कुबेर ११ अलिबाग आयोजित माजी आमदार मधुकर (पप्पा) ठाकूर स्मृती चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेत किहीम सरपंच पिंट्या गायकवाड पुरस्कृत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ किहीम यांनी अटीतटीच्या लढतीत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल सर्व स्तरातून खेळाडूंचे अभिनंदन केले जात आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार, दि. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं. ६.३० वा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा काळात सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरीता व स्पर्धेची शोभा द्विगुणीत करण्याकरिता अनेक मान्यवर पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती. स्पर्धेत अंतिम सामना किहीम सरपंच पिंट्या गायकवाड पुरस्कृत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ किहीम व आरिफ इलेव्हन या दोन दिग्गज संघात झाला. यावेळी झालेल्या अटीतटीच्या लढतीत आरिफ इलेव्हन संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर किहीम सरपंच पिंट्या गायकवाड पुरस्कृत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ किहीम या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज म्हणून शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ किहीम या संघाचा शुभम म्हात्रे याला घोषित करत उत्कृष्ट पारितोषिक देण्यात आले. तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून खंडाळे संघाचा पप्या पाटील याला घोषित करत आकर्षक पारितोषिक देण्यात आले. तसेच मालिकावीर म्हणून आरिफ इलेव्हन या संघाचा आयुब शेख याला घोषित करत आकर्षक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सर्व विजयी संघांना व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते आमिर (पिंट्या) ठाकूर व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व आकर्षक चषक देण्यात आले. स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

किहीम सरपंच पिंट्या गायकवाड पुरस्कृत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ किहीम या संघात अभिषेक पेडणेकर (कर्णधार), ऋषिकेश राऊत, ऋतिक काठे, दिपक बेंद्रे, मिलिंद म्हात्रे, शुभम म्हात्रे, महेश भोईर, शुभम काठे, शिवम सावंत, विशाल मुरकर, अमित देवरुखकर, मनोज म्हात्रे, हृषीकेश दळवी यांनी खेळामध्ये दर्जेदार कामगिरी करत संघाला द्वितीय क्रमांक मिळवून दिल्याबद्दल किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक करत अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!