• Sun. Jul 13th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘आदिती महोत्सवा’चे आयोजन

ByEditor

Feb 15, 2025

हळदी कुंकू कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे -मुस्कान झटाम

विनायक पाटील
पेण :
महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, भारतीय पेट्रोलियम व गॅस नियमाक मंडळ केंद्र सरकार चेअरमन, खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला व बालकल्याण मंत्री नामदार आदितीताई तटकरे व माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने पेण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ‘आदिती महोत्सव’…जल्लोष नारिशक्तीचा महोत्सव उद्या रविवार, दिनांक १६/२/२०२५ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता पेण नगरपालिका मैदान येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे खास आकर्षण लग्नाची बेडी फेम अभिनेत्री सायली देवधर उपस्थित राहणार आहेत. तरी तालुका व शहरातील सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पेण शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष मुस्कान झटाम यांनी केले आहे.

पेण शहर व पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दरवर्षी हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पाडला जातो. हजारोच्या संख्येने या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती असते. उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाते. खेळ पैठणीचा, नृत्य व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जातात. यावर्षी देखील महिलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे मुस्कान झटाम यांनी बोलताना सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!