• Mon. Jul 14th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बाहे गावातील कलिंगडे निघाली परदेशाला!

ByEditor

Feb 17, 2025

जगदीश थिटे यांनी घेतले कलिंगडाचे उत्तम पिक

विश्वास निकम
कोलाड :
रोहा तालुक्यात बाहे गाव हे भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव आहे. गावातील असंख्य शेतकरी अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात भाजीपाला व्यवसाय करीत आहेत. एवढेच नाही तर १९८९च्या पुरामुळे गावाचे पुनर्वसन झाले, यामुळे आपल्या शेतीपासून येथील गावकऱ्यांना दूर रहावे लागले. परंतु तरीही येथील शेतकऱ्यांनी कधीही हार मानली नाही. उन्हाळ्यात शेतावर झोपडी बांधून भाजीपाला व्यवसाय सुरु ठेवला आहे.

बाहे येथील शेतकरी जगदीश थिटे यांनी भाजीपाला पिक सोडून यावर्षी कलिंगड पिक घेण्याचे ठरविले. सर्व मेहनत करुन कलिंगडाचे पिक उत्तम प्रकारे आले आहे. तसेच कलिंगडाचे फळंही मोठे झाले आहे. शिवाय रंग लालसर व त्याची चव अतिशय गोड असल्यामुळे या कलिंगडाला परदेशातून मागणी आल्यामुळे ही कलिंगड परदेशात रवाना झाली आहेत. यामुळे शेतकरी जगदीश थिटे यांनी केलेली मेहनत कामी आली असुन त्यांना या कलिंगड पिकापासून फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!