प्रतिनिधी
नागोठणे : येथील बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी रमाकांत (आप्पा) शिवराम काळे (७४) यांचे रविवार, दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. कै. रमाकांत काळे यांच्यावर रविवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी वर्ग, ग्रामस्थ, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतिशय मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावाचे म्हणून कै. रमाकांत काळे पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात मुलगा अजित, सुन, नातवंडे असा परिवार असून कै. रमाकांत काळे यांचा दशक्रिया विधी मंगळवार, दि. 25 फेब्रुवारी २०२५ रोजी आंबा घाट नागोठणे येथे तर उत्तरकार्य शुक्रवार, दि. 28 फेब्रुवारी २०२५ रोजी नागोठणे येथील राहत्या घरी येथे होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.