• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ग्रामसभेत अडथळा निर्माण केल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल, एकास अटक तर दुसरा निसटला

ByEditor

Jul 29, 2023

म्हसळा तालुक्यातील पांगलोळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतील प्रकार

वैभव कळस
म्हसळा :
तालुक्यातील पांगलोळी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून शासन चौकशी झाली असता संपुर्ण ग्रामपंचायत बरखास्त करून येथे प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासक पाटील यांनी त्यांचे अधिकारात व शासन नियमानुसार दि. २४ जुलै २०२३ रोजी दु. ११.३० वाजता ग्रामसभा आयोजित केली होती. ग्रामसभेत अडथळा निर्माण केल्याबद्दल दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक केली असून एक पळून गेला.

प्रशासक पाटील यांनी त्यांचे अधिकारात व शासन नियमानुसार दि. २४ जुलै २०२३ रोजी दु. ११.३० वाजता ग्रामसभा आयोजित केली होती. ग्रामसभा सुरु असताना पांगलोळी येथील ग्रामस्थ अझहर निजामुद्दीन धनसे व मुजाहीद निजामुद्दीन धनसे यांनी संगनमत करुन ग्रामसभेत उपस्थित राहुन व्हिडिओ चित्रफित काढली तसेच प्रशासक श्री. पाटील यांना धमकी देत, ग्रामस्थां समक्ष चोर बोलुन लोकांना सभेतून जाण्यास भाग पाडले अशा प्रकारे आरोपी यांनी शासकीय कामात अडथळा आणुन फिर्यादी आणि प्रशासनाची बदनामी केली म्हणुन फिर्यादी गणपती मच्छिंद्र केसरकर (वय वर्षे ४८, मुळगाव घारगाव, करमाळा,सोलापूर, सद्या वास्तव्य चोचे बिल्डिंग म्हसळा) यांनी दिनांक २६ जुलै २०२३ रोजी म्हसळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असता पोलिसांनी आरोपींवर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हा रजि.नं.९५/२३ भा.द.सं.कलम ३५३,५००,५०६,३४ सह क्रिमिनल लॉ.अमेडमेंट चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे माहिती पोलिस निरीक्षक संदीपान सोनवणे यांनी दिली. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक डी. व्ही. एडवळे हे करीत आहेत. वरील दोन इसमांपैकी मुजाहीद निजामउद्दीन धनसे यास अटक करण्यात आली असून अझहर धनशे हा पोलिसांच्या हातून निसटल्याची माहिती समोर आली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!