मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूला पाच वर्षे पूर्ण होत आली आहेत. 14 जून 2020 रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या मुंबईतील घरात आढळला होता. गळफास घेत त्याने आयुष्य संपवलं होतं. सुशांतने अचानक आत्महत्या का केली यावर बराच गदारोळ झाला होता. या प्रकरणाला राजकीय किनारही लागली होती. प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. अशातच आता एका डॉक्टरने केलेल्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. यूट्यूब चॅनलवर आध्यात्मिक गुरू, सायकिक आणि मीडियम म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर मनमीतकुमार यांनी एक पोस्ट केली आहे.
या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सुशांतसिंह राजपूतचा आत्मा अजूनही या जगात आहे. दोन वर्ष त्याचा आत्मा आमच्याकडे येतो. डोळे उघडले तर शेजारी सुशांत सिंहचा आत्मा बसलेला. कुणीतरी त्याच्यावर पुस्तक लिहावं आणि कुणीतरी त्याचं सत्य बाहेर आणावं, त्याच्यावर पुस्तक प्रकाशित करावं, असे डॉ. मनमीतकुमार यांनी म्हटले आहे. माझा प्राणायाम संपेपर्यंत शांतपणे त्याचा आत्मा वाट पाहत होता. ज्यावेळी मी डोळे उघडले त्यावेळी मी खूप घाबरले. पण नंतर मला कळालं की हा सुशांतसिंह राजपुतचा आत्मा आहे. तो मला सांगत होता की तू माझी कहाणी अजूनही लोकांना का सांगितली नाहीस. सुशांतची अशी इच्छा आहे की कुणीतरी आता त्याच्यावर पुस्तक लिहावे त्यातील सत्य काय आहे ते बाहेर आणावे. पुस्तक प्रकाशित करावे.
सुशांतसिंह राजपूतचा आत्मा अजूनही या जगात आहे. त्याचा आत्मा अजून या जगातून गेलेला नाही. यामागचे कारण म्हणजे त्याचा रहस्यमय मृत्यू झालेला नसून लोकांचे त्याच्यावरचे प्रेम आहे. यामुळेच तो अजूनही भावनिकदृष्ट्या लोकांशी जोडला गेलेला आहे, असेही मनमीतकुमार यांनी सांगितले.