४६ रक्तदात्यांनी केले रक्तदान
पाली : श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली व रुधिरसेतू सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि, २३/०२/२०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत भक्त निवास क्रमांक १ येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ४६ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.

यावेळी रक्तदात्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र रुधिरसेतू सेवा संस्था यांच्या वतीने देण्यात आले. शिबीर यशस्वी होण्यासाठी श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ, कर्मचारी वर्ग तसेच रुधिर सेतू सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परीश्रम घेतले.