• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

खारघर येथील पाककला स्पर्धेच्या मानकरी ठरल्या नागोठण्यातील सेजल खराडे

ByEditor

Feb 26, 2025

नागोठणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५व्या जयंतीचे औचित्य साधून खारघर (नवी मुंबई) सेक्टर ११ येथे टीडब्लूजे असोसिएट्स खारघर आणि शिव आधार सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ४८ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक नागोठणे येथील नाभिक समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिगंबर खराडे यांची सुन सेजल दिपक खराडे, द्वितीय क्रमांक खारघर येथील कु. नेहा कदम व तृतीय क्रमांक नालासोपारा येथील उषा रमेश म्हात्रे यांनी पटकावला. या यशाबद्दल रायगड जिल्हा नाभिक समाजातर्फे तसेच संपूर्ण नागोठणे पंचक्रोशीतून सेजल खराडे यांचे अभिनंदन होत आहे. सेजल खराडे यांनी यापूर्वी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या वाढदिवसानिमित नागोठणे येथे आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेत द्वितीय क्रमांक तर खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा येथे आयोजित पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!