अलिबाग : अलिबाग एसटी स्टॅण्डसमोर एसटीची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी (दि.27) सकाळी पावणेबाराच्या सुमारास हा अपघात घडला असून जयदीप बना (रा. वरसोली कोळीवाडा) असे अपघातातील मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळत आहे.
अपघातानंतर अलिबाग आगारासमोर प्रचंड प्रमाणात गर्दी जमा झाली असून नागरिक संतप्त झाले आहेत. हा अपघात नेमका कसा घडला याबाबत अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.