नागोठणे : येथिल कोएसो आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. दीपप्रज्वलन करून सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केले.

यानंतर महाविद्यालयात डॉ. संदेश गुरव यांनी विद्यार्थ्यांना अवयव दानाचे महत्व पटवून दिले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना अवयव दान जागृतीपर शपथ देण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून अवयव दानावर आधारित पोस्टर्सचे प्रदर्शन आयोजित केले होते. यामध्ये २२ मुले व ३६ मुली सहभागी झाले होते.