• Sat. Jun 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेणमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; गुन्हा दाखल

ByEditor

Feb 28, 2025

पेण : 15 वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून व व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाविरोधात पेण पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनिष नरेंद्र म्हात्रे असे या तरुणाचे नाव आहे.

पिडीत मुलगी आणि मनिष यांची स्नॅप चॅटवरुन मे 2024 मध्ये ओळख झाली. त्यावर ते एकमेकांशी बोलू लागले. ऑगस्ट 2024 मध्ये मनिष याने पिडीत मुलीला तु मला आवडतेस मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. असं बोलून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर सायन्स विषयाच्या नोटस् घेण्यासाठी ते साई मंदिर पेण येथे भेटले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मनिष याने आपल्या चिंचपाडा येथील श्री शिवाली गृहनिर्माण संस्था येथील घरी बोलावून तिच्या इच्छेविरुध्द तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला तु कोणाला सांगितलास तर तुझा व्हिडिओ व्हायलर करीन अशी धमकी दिली. त्यानंतर अनेकदा त्याने तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीच्या वडिलांना ही बाब माहिती झाल्यानंतर, ही बाब उघडकीस आली. पेण पोलिसांनी याप्रकरणी मनिष म्हात्रे याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पेण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४(२) (१), ६४(२) (एम) तसेच बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२, ४,६,८ (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला 28 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!