घन:श्याम कडू
उरण : उरण पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकीत १ लाख रुपये किंमतीचा गांजा आरोपीसह पकडला आहे.
दिनांक 26/02/2025 रोजी उरण पोलीस ठाणेतील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे दिनांक 26/02/2025 रोजी 20:35 वा.च्या सुमारास डीआरटी काॅन्कोर कंपनीजवळ, डीआरटी काॅन्कोर ब्रिजचे खाली, पागोटे, ता. उरण, जि. रायगड याठिकाणी साहे आलम अब्दुल सलाम (वय 33, व्यवसाय – चालक, रा. मुकीम अहमद यांची रूम, ठाकुरपाडा, दहिसर मोरी, जि. ठाणे) याचे ताब्यात 99,000/- रु. कि.चा 1 किलो 650 ग्राम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ मिळून आल्याने उरण पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र. 36/2025 गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) अधिनियम 1985चे कलम 8(क), 21(ब) अन्वये दिनांक 27/02/2025 रोजी 1.13 वा. दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पनवेल परिमंडळ 2 चे पोलीस उप आयुक्त प्रशांत मोहिते व सहाय्यक पोलीस आयुक्त, पोर्ट विभाग डाॅ. विशाल नेहुल यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सदर कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, पोलीस निरीक्षक (प्रशासन) शरद जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खाडे, पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड, पोलीस हवालदार रविंद्र ठाकुर, पोलीस हवालदार शशिकांत घरत, पोलीस हवालदार रूपेश पाटील, पोलीस हवालदार गणेश शिंपी, पोलीस नाईक मच्छिंद्र कोळी, पोलीस शिपाई सचिन माळशिकारे, पोलीस शिपाई मासाळ असे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. सदर गुन्ह्यातील आरोपीत यास रिमांडकामी न्यायालयात हजर करण्यात आले.