विनायक पाटील
पेण : जेएसडब्ल्यू व मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील अलिबाग व पेण या तालुक्यामधील 26 शाळामध्ये ऑगस्ट 2024 पासून जेएसडबल्यू aspire हा प्रोग्राम सुरू झाला आहे. या उपक्रमामार्फत जीवन कौशल्य व गणित तसेच भाषा या विषयांचे पायाभूत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे.

27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन हा जोहे, दादर, जिते व कुसुंबळे या गावांमधील शाळेत साजरा करण्यात आला. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता. सुमारे 357 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. आयोजित सर्व कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव दिला. मुलांनी सुंदर अशी कविता वाचन, नृत्य, मराठी भाषेचे महत्व याबाबतीत आपले मत मांडले. मराठी राजभाषा दिन या कार्यक्रमामध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य, पालक, शिक्षक यांनी उपस्थिती दाखवून आपले अनुभव व मत मांडले.
या कार्यक्रमाच्या शेवटी आमचे संपूर्ण सहकार्य या प्रोजेक्टसाठी देऊ असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॅजिक बसच्या क्लस्टर मॅनेजर डॉ. प्रगती पाटील व मॅजिक बसचे एज्युकेटर्स यांनी प्रयत्न केले.
