• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडच्या वरंध घाटात ST बसचा भीषण अपघात

ByEditor

Mar 15, 2025

चालकाचा ताबा सुटला अन् बस 50 फूट खोल दरीत कोसळली

महाड : रायगडच्या वरंध घाटात एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. भोर-महाड मार्गावर वरंध घाटात हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. घाटामध्ये एका वळणावर बस ५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बस सुनेभाऊ महाडकडे जायला निघाली होती. बस वरंध घाट उतरून महाडच्या दिशेनं जात असताना घाटातील बेबीचा गोल या अवघड वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला त्यामुळं गाडी रस्त्याच्या कडेला सुमारे पन्नास फूट खाली कोसळली. या बसमधून प्रवास करणारे 17 प्रवासी जखमी झाले आहेत. बसच्या अपघाताची खबर कळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीनं मदत कार्य सुरू केलं तसंच बसमधील प्रवाशांना बाहेर काढलं आणि महाड ग्रामीण रुग्णालय तसंच बिरवाडी इथल्या प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी तातडीनं रवाना करण्यात आलं.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व जखमींवर महाडच्या ट्रॉम केअर युनिटमध्ये उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच मंत्री भरत गोगावले यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!