• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण शिवसेनाच्यावतीने प्रांजल कडू हिचा सत्कार

ByEditor

Jul 31, 2023

घनःश्याम कडू
उरण :
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उरण तालुका व शहर शाखाच्यावतीने उरण शहरांतील श्रीराम मंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्या अंतर्गत तालुक्यात इयत्ता 10 वी व 12 वी पर्यंतच्या शाळेत पहिल्या तीन क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या प्रामुख्याने उरणमधील सेंटमेरी विद्यालयांतील प्रांजल घनश्याम कडू हिचा समावेश होता.

कु. प्रांजल कडू ही मुळातच हुशार असून सुसंस्कृत कुटुंबात जन्म घेतला आहे. आपले आजोबा गुरुवर्य दा. चां. कडू गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने आपले शिक्षण उरण येथील सेंटमेरी विद्यालयात इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमांतून पूर्ण केले असून इयत्ता 10 मध्ये ती 90 टक्के गुण मिळून पास झाली होती. चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर तिने इयत्ता 12 वी मध्ये सायन्स हा विषय घेऊन 76 टक्के गुण मिळवून विद्यालयातून तिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

कु. प्रांजल ही उत्तम चित्रकार असून आजपर्यंत तिने श्री गजानन, राधाकृष्ण, श्री छत्रपती शिवाजी महाराज, मा. बाळासाहेब ठाकरे, मा. रामशेठ ठाकूर, मा. प्रशांत ठाकूर, क्रिकेटर विराट कोहली, सिनेस्टार दिपीेका पादुकोन आदींची चित्रे काढली आहेत. आपले स्वतःचे चित्र पाहून माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी तिचेकौतुक केले होते व तीच्या कलेला प्रोत्साहन दिले होते. तिने काढलेल्या भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांचे पोट्रेट उरणात भरविण्यात आलेल्या चित्रकला प्रदर्शनात प्रचंड गाजले होते. त्यामुळे कु. प्रांजल ही केवळ अभ्यासात हुशार नाही तर विविध कलेत ती नैपुण्य प्राप्त आहे. प्रांजल कडू कॅम्प्युटर सायन्स विषयाचे उच्च शिक्षण घेत आहे. त्याचे सारे श्रेय ती बाबा घनःश्याम कडू आई वैशाली कडू यांच्या बरोबरीने काका दैनिक वादळवाराचे मालक संपादक विजय कडू, दिलीप कडू त्याचबरोबर विद्यालयांतील शिक्षकांना देते.

उरण शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उरण तालुका व शहर शाखेच्यावतीने तिचा सेंटमेरी विद्यालयात 76 टक्के गुण मिळून तिने तृतीय क्रमांक मिळविला असल्याने सत्कार खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सल्लागार बबनदादा पाटील. माजी आमदार तथा रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, नगरसेवक अतुल ठाकूर, पंस सदस्य दीपक ठाकूर, प्रदीप ठाकूर, एस. के. पुरो, विद्यार्थी, पालक, शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यानंतर अनेकांनी प्रांजलचे अभिनंदन केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!