• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव तालुक्यात शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरूच

ByEditor

Jul 31, 2023

ढाकशेळी ग्रामस्थांचा प्रवेश, आ. भरत गोगवलेंकडून स्वागत

सलीम शेख
माणगाव :
शिवसेनेच्या विकासकामांनी भारावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आ. भरतशेठ गोगावले यांची काम करण्याची पद्धत पाहून माणगाव तालुक्यातील ढाकशेळी गावातील ग्रामस्थांनी ठाकरे गटामधून मुंबई येथील बाळासाहेब भवन या ठिकाणी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्व प्रवेशकर्त्यांचे आ. भरतशेठ गोगावले यांनी पक्षात स्वागत केले.

माणगाव तालुक्यातील मोर्बा विभागातील कुमशेत ग्रामपंचायत हद्दीतील मौजे ढाकशेळी येथील ग्रामस्थ, महिला भगिनींसह ढाकशेळी ग्रामस्थ नागेश घाग ढाकशेळी गाव अध्यक्ष, रेश्मा नागेश घाग विद्यमान उपसरपंच कुंमशेत, शंकर सावंत, हसाराम घाग, संजय घाग, रवींद्र सुतार, प्रकाश सुतार, विलास सुतार, जितेंद्र शेलार, दिपाली शेलार, वृषाली शेलार, संचिता कदम, मानसी सुतार, सुहास घाग, रुपेश घाग, सचिन घाग, राकेश घाग, सिद्धी घाग, विशाल सुतार, दत्ताराम घाग, अनंत राणे, धनाजी सावंत, मुंबई मंडळ- मंगेश सुतार अध्यक्ष, जयवंत घाग उपाध्यक्ष, संदीप राणे, अमर राणे, अजित सावंत, विशाल राणे, सचिन शेलार, रोहन सुतार, आर्यन शेलार, राम सुतार, धोंडू सुतार, रामचंद्र शेलार, राहुल घाग इत्यादी ढाकशेळी मधील ग्रामस्थ महिला भगिनींसह मुंबई मंडळ ग्रामस्थ मंडळ यांनी ठाकरे गटामधून मुंबई येथील बाळासाहेब भवन या ठिकाणी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला असल्याचे आ. भरत गोगावले यांनी सांगितले. यावेळी प्रवेश कर्त्यांचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी भगव्या पताका घालून शिवसेना पक्षात सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. प्रवेशकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार गोगावले यांनी सांगितले की आपणांस शिवसेना पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल आज पर्यंत तुमच्या गावात आणि विभागात शिवसेनेच्याच माध्यमातून आम्ही विकास कामे केलेली आहेत आणि जी काही आपली उर्वरित विकास कामे असतील ती लवकरच पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू असे गोगावले यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले.

या पक्षप्रवेश समारंभावेळी उपस्थित चंद्रकांत जोरकर महाड विधानसभा संपर्कप्रमुख जय सावंत, माणगाव तालुका संपर्कप्रमुख राकेश तुपट, माणगाव तालुका सहसंपर्कप्रमुख शलाका पाटील, मुंबई महिला संपर्कप्रमुख अपेक्षा जाधव, निलेश कदम शाखाप्रमुख, प्रकाश गोरीवले उपतालुकाप्रमुख, सुजित शिंदे माजी सभापती, ज्ञानदेव पदरात उपविभाग प्रमुख, प्रसाद देवळेकर मोर्बा- मांजरवने विभाग युवा अधिकारी, विनायक कालप सरपंच मढेगाव तसेच विश्वास काविनकर, दिनेश लोखंडे, बापू लोखंडे, सुनील कांबळे, राजेंद्र किसबिले, रवींद्र करकरे युवा सेना संपर्कप्रमुख, सचिन कदम सरपंच कुमशेत इत्यादी शिवसेना- युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी या पक्षप्रवेश समारंभ वेळी मुंबई येथे उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!