• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोकण कन्या ट्रॉफीसाठी रायगड जिल्हा मुलींच्या संघाची अंतिम यादी

ByEditor

May 24, 2023

चंद्रशेखर सावंत
वरसे-रोहा :
दि. 23 मे 2023 रोजी एमडीएन फ्युचर स्कूल कोलाड मैदानावर घेण्यात आलेल्या सराव सामन्यातून रायगड प्रिमीयर लीग पुरस्कृत कोकण कन्या ट्रॉफीसाठी रायगड जिल्ह्यातून आलेल्या खेळाडूंमधून अंतिम 20 जणांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली.

समृद्धी कांबळे, समिधा तांडेल, खुशी भारती, वैभवी कुलकर्णी, ईश्वरी खत्री, अक्षया यादव, अमिषा बामणे, आर्या गाडाडे, आर्या पाटील, रोशनी पारधी, अस्मिता गोवारी, प्रांजल चिंचवणे, प्रांजल चिपळूणकर, गार्गी साळुंखे, कृतिका पाटील, निशिता विटलांनी, कृतिका मुंडे, मनीषा लिंबोरे, एकता शर्मा, स्वरा खेडेकर अशी अंतिम निवड झालेल्या खेळाडूंची नावे आहेत. निवड प्रक्रिया पूर्णत्वास नेण्याकरिता रायगड प्रीमियम लीगचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण कन्या ट्रॉफीचे सदस्य यांनी काम केले. सदर निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यात आली असल्याची माहिती राजेश पाटील यांनी दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!