• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्ह्यातील दिव्यांगांना लाभ घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

ByEditor

May 24, 2023

अमूलकुमार जैन
अलिबाग :
रायगड जिल्ह्यातील दिव्यागांसाठी रायगड जिल्हा परिषदेमार्फत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन रायगड जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ५% दिव्यांग कल्याण निधीमधून वैयक्तिक अर्थसहाय्य लाभाच्या योजना DBT तत्त्वावर राबविण्यात येत आहेत. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे (व्हॅन्डींग स्टॉल/पीठ गिरणी/शिलाई मशिन/मिरची कांडप मशिन/झेरॉक्स मशिन इत्यादी), दिव्यांग व्यक्तीना स्वयंरोजगासाठी अर्थसहाय्य देणे (पापड मशिन, पिशव्या बनविण्याचे मशिन, पत्रावली बनविण्याचे मशिन, काजू सोलण्याचे मशिन इत्यादी) दिव्यांग अव्यंग व्यक्तीशी विवाहितांना आर्थिक सहाय्य देणे (१ एप्रिल २०१४ नंतरचे विवाहित जोडपं असणे आवश्यक), दिव्यांग क्षेत्रात कार्यरत व्यक्ती/नोंदणीकृत संस्था यांना दिव्यांग प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करणे. दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार थेरपीसाठी अर्थसहाय्य देणे (उदा. फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऍक्युपंक्चर इत्यादी), मतिमंद व्यक्तीकरिता नॅशनल ट्रस्ट मार्फत राबविण्यात येणाऱ्या निरामय योजनेचे हप्ते भरण्याकरिता अर्थसहाय्य देणे. दिव्यांग व्यक्तीना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरिता अर्थसहाय्य देणे. कर्णबधिर मुलांच्या क्वॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य देणे आदी योजना जिल्हा परिषदेच्या आहेत.

सदर योजना घेण्यासाठी लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, रायगड जिल्ह्याचा रहिवासी दाखला किंवा रेशनिंग कार्डची झेरॉक्स प्रत ३, ऑनलाईन वैश्विक प्रमाणपत्र (UDID), वैद्यकीय मंडळाकडील किमान ४०% दिव्यांगत्वाचा दाखला, BPL घटकातील लाभार्थ्यास प्राधान्य, सक्षम अधिकाऱ्याचा उत्पन्नाचा वार्षिक दाखला (रू.१,००,०००/- च्या आतील) अथवा कुटुंब दारिद्रय रेषेखाली असल्याचा संबंधित ग्रामसेवकाचा दाखला, मतिमंद व बहुविकलांग पाल्याच्या पालकांस लाभासाठी पात्र ठरविण्यात येईल. (पाल्याच्या अपंगत्वाचा दाखला सादर करणे अनिवार्य), यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, बैंक पासबुकाची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे.

योजनेच्या निकषानुसार पात्र असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी साधारणतः दि. ३० सप्टेंबर २०२३ पुर्वी संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांचे कार्यालयाशी संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यावा व आवश्यक त्या सर्व कागदपत्राच्या प्रतीसह परिपूर्ण अर्ज गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांचेमार्फत कल्याण विभागाकडे सादर करण्याचे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!