मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ कंपनीने आज मार्केटमध्ये स्वस्त आणि मस्त लॅपटॉप लाँच केला आहे. Reliance JioBook हा 4G इनेबल्ड लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये असे कित्येक फीचर्स आहेत, जे महागातील महाग लॅपटॉपलाही तगडी टक्कर देऊ शकतात. Reliance JioBook 4G लॅपटॉपची किंमत 20 हजार रूपयांपेक्षा कमी आहे.
Reliance JioBook 4G मधील फीचर्स:
या लॅपटॉपमध्ये 4G LTE, वायफाय, ब्लूटूथ 5.0, एचडीएमआई पोर्ट, 3.5mm ऑडियो जॅक आणि ड्युअल सिम सपोर्ट हे फीचर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लॅपटॉपचे वजन 999 ग्रॅम इतके आहे. तर या लॅपटॉपची किंमत 16 हजार 499 रूपये इतकी आहे.
विशेष म्हणजे ग्राहकाचे बजेट लक्षात घेता कंपनीने लॅपटॉप स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचे ठरवल्याचे म्हटलं जात आहे. यापूर्वी जिओबुक वर्ष 2022 मधील ऑक्टोबर महिन्यात लाँच करण्यात आला होता.