सलीम शेख
माणगाव : ‘समृद्ध तट समृद्ध भारत’ हे ब्रीदवाक्य घेऊन संपूर्ण भारतभर सुरु असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सायकल रॅलीचे शुक्रवार, दि. २१ मार्च २०२५ रोजी माणगावात जोरदार स्वागत करण्यात आले.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५६व्या वर्धापन दिनानिमित्त गुजरात येथील लखपत किल्ला येथून सुरू झालेली सायकल यात्रा राममूर्ती असिस्टंट कमांडर यांच्या नेतृत्वाखाली ५० सायकलस्वार यांची ‘समृद्ध तट समृद्ध भारत’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू असलेल्या सायकल यात्रेचे माणगाव पोलीस ठाणे हद्दीत महामार्गावरील नवीन हॉटेल आनंद भुवन याठिकाणी सकाळी ८ वाजता आगमन होऊन सदर यात्रेचे स्वागत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा लाड, वाहतूक शाखेचे पोलीस तसेच माणगाव तालुका रिक्षा संघटनेचे पदाधिकारी जमाल पिलपिले, नामदेव खराडे, नरेश सावंत यांच्यासह उपस्थित माणगावकरांनी करून सायकलस्वारांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर या टिमची हि सायकल यात्रा सकाळी ९.२० वाजता तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत रवाना झाली. सदर वेळी योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
