• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सुधागड मराठा समाजाच्यावतीने विनामूल्य करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

ByEditor

Mar 21, 2025

वार्ताहर
पाली :
सुधागड मराठा समाज संस्थेच्यावतीने इयत्ता 10 वी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व करिअरच्या वेगवेगळ्या वाटा समजुन घेण्यासाठी रविवार, दि. 23 मार्च 2025 रोजी दुपारी 1.30. वाजता सुधागड तालुका मराठा संस्थेचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांच्या अध्यक्षतेखाली विनामूल्य करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे.

सदर शिबिरास महाराष्ट्रराज्य प्रशासकीय सेवा प्रशिक्षण केंद्र, करिअर मेकर्स अकॅडमी मुंबई तथा झी 24 तास, साम मराठी, दूरदर्शन (सह्याद्री) या वृत्तवाहिन्यांनावर करिअर विषयक मार्गदर्शन करणारे प्राध्यापक संजय मोरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी या शिबिरास आपल्या तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील शाळा, विद्यालय, महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्व. स. स. साजेकर सभागृह मराठा समाज भवन, पाली-शिळोशी रोड पाली, ता. सुधागड जि. रायगड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा समाज संस्थेच्यावतीने आणि संस्थेचे अध्यक्ष धनंजय साजेकर संस्थेचे कार्याध्यक्ष बळीराम निंबाळकर,सरचिटणीस सुजित बारसकर, खजिनदार योगेश मोरे, शिक्षण समिती प्रमुख प्रा. संतोष भोईर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!