उरण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
घन:श्याम कडू
उरण : मोटारसायकल चोरी प्रकरणी उरण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दोन इसमांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरोधात एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शरद भारत सांगोलकर (वय २९ वर्षे, रा. वाकी घेरडी, ता. सांगोला, जि. सोलापूर), संजय तमा निमगरे (वय ३४ वर्षे, रा. वाकी घेरडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेतले असून उरण पोलीस ठाण्यात गु.र.न ०७/२५, ०८/२५, २८२/२४, ३३१/२४, पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.न ०८/२४ या गुन्ह्यांची उकल झाली आहे. तपासादरम्यान एक हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल (इंजिन क्रमांक 03A18M23221) जप्त करण्यात आली असून, संबंधित गाडीच्या आरटीओ तपासणीसाठी पत्रव्यवहार सुरू आहे. त्यांच्याकडून एकूण ६ मोटरसायकली (अंदाजे किंमत १ लाख ८० हजार रुपये) हस्तगत करण्यात आल्या. सदरची उल्लेखनीय कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ ०२ प्रशांत मोहिते, सहायक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) विशाल नेहुल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खाडे पोलीस उप निरीक्षक संजय राठोड व पथकाने हि कारवाई केली.
