विश्वास निकम
कोलाड : सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंतशेठ ओसवाल यांचे निधनानंतर सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पद रिक्त झाले होते. त्यांचा वारसा पुढे सुरु ठेवण्यासाठी त्यांच्या कन्या तथा सामाजिक कार्यकत्या गीता पारलेचा यांची निवड करण्यात आली आहे.
गीता पारलेचा यांची सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे संचालक राजेंद्र पालवे, सचिव ग. रा. म्हात्रे, ज्योत्स्ना देसाई, विवेक मोहिते, महेशशेठ ओसवाल, कोलाड हायस्कूलचे मुख्यध्यापक सुखदेव तिरमले, माजी मुख्यध्यापक शिरीष येरुणकर, अविनाश माळी, अमरीश सानप, विश्वजीत देशमुख, प्रदीप नागोठकर, विजय साखरले, डी. आर पाटील तसेच सुशील शिंदे, किरण चव्हाण, राहुल भंडारी, राकेश बेलोशे, सुजय झोलगे, बंटी दिघे, ओंकार बालके, सूरज मेडन, दिपक फोडे, संदीप काटकर तसेच ओजस मित्रमंडळ पालीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी अभिनंदन केले असुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
