• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; नेहा भोसले रायगडच्या नव्या सीईओ

ByEditor

Apr 2, 2025

डॉ. भारत बास्टेवाड यांची रोजगार हमी योजनेच्या नागपूर विभाग आयुक्तपदी नियुक्ती

रायगड : राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका आहे. गेल्याच आठवड्यात पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन 4 महिन्यांहून अधिक कालावधी होऊन गेला आहे, तरी देखील प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश थांबण्याचे नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं मंगळवारी (ता.1 एप्रिल) पुन्हा एकदा सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये भारत बास्टेवाड यांची नागपूरमध्ये रोजगार हमी योजनेच्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नेहा भोसले रायगडमध्ये आल्या आहेत. त्यांनी बुधवारी (2 मार्च) दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी स्वीकारली. डॉ. भारत बास्टेवाड यांनी जुलै 2023 मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार स्वीकारला होता. नेहा भोसले या आधी हिंगोली जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.

बदली झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे :

१. इंदुराणी जाखर – पालघर जिल्हाधिकारी
२. वैष्णवी बी – अतिरिक्त आयुक्त, नागपूर मनपा
३. भारत बास्टेवाड – रोजगार हमी योजना, नागपूर
४. राजेंद्र भारूड – अतिरिक्त विकास आयुक्त, उद्योग
५. नेहा भोसले – रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
६. लक्ष्मी नारायण मिश्रा – जॉईन्ट एमडी, एमएसआरडीसी
७. निधी पांडे – व्यवस्थापक संचालक, लघुउद्योग

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!