• Sun. Jul 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

म्हसळा तालुक्यातील पांगळोली ग्रामपंचायतीत 28 लाखांचा अपहार

ByEditor

Apr 3, 2025

म्हसळा : तालुक्यातील पांगळोली ग्रामपंचायतीमध्ये 28 लाखाचा अपहार झाला असल्याची तक्रार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी दिली आहे. याप्रकरणी तत्कालीन सरपंच आणि तलाठी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

म्हसळा तालुक्यातील पांगळोली ग्रामपंचायतमध्ये तब्बल २८ लाख ९ हजार ५५४ रुपयांचा अपहार झाल्याची फिर्याद म्हसळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी पोलिस ठाण्यात केली आहे. गुन्हा नोंदवून फिर्यादीनी दिलेल्या तक्रारीवरून तत्कालीन सरपंच नबाब अजिज कौचाली आणि ग्रामसेवक गणपती मच्छींद्र केसकर या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. दोनही आरोपींनी १ एप्रिल २०१५ ते २९ ऑगस्ट २०१८ या तीन वर्षाचे कारकीर्दीत सुमारे २८ लक्ष ९ हजार ५५४ चा अपहार केल्याची तक्रार गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी केली आहे. खुद्द पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तक्रार दिली असल्याने अनेक ग्रामसेवक, सरपंच यांचे धाबे दणाणले आहेत. तर काही ग्रामसेवक आपले कामकाज पूर्ण करण्याचे तयारीला लागले आहेत.

म्हसळा पंचायत समितीचे अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत पांगळोली येथे 28 लाखापेक्षा जास्त रकमेचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी हायकोर्ट आणि वरिष्ठांच्या आदेशाने कार्यवाही करून म्हसळा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद केली आहे. याबाबत पुढील सविस्तर प्रक्रिया पोलीस प्रशासन व न्यायालयाच्या आधिपत्याखाली सुरु राहील.
-माधव जाधव,
गटविकास अधिकारी, म्हसळा पंचायत समिती

By Editor

One thought on “म्हसळा तालुक्यातील पांगळोली ग्रामपंचायतीत 28 लाखांचा अपहार”
  1. I read Janoday’s local news every day.
    The news is very accurate and correct.
    Best of luck to you

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!