• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माथेरानच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांची सदिच्छा भेट

ByEditor

Apr 5, 2025

विनायक पाटील
पेण :
माथेरानच्या समस्या व विकास या संदर्भात माथेरान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी आज शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांची त्यांच्या नवी मुंबईतील कार्यालयात भेट घेतली. यावेळी माथेरानच्या इको सेन्सिटिव्ह झोन, ई रिक्षा, पर्यटन विषयक काही समस्या यासोबतच पक्ष संघटना व पक्ष वाढीसाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रसंगी शहर प्रमुख कुलदीप जाधव, समन्वयक अनिल घोणे, कामगार सेनाप्रमुख रत्नदिप प्रधान, सचिन दाभेकर, युवा अधिकारी नितेश मेहता, युवासेना सचिव श्रेयस गायकवाड आदि पदाधिकारी उपास्थित होते.

शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी सर्व समस्या समजून घेत सदर विषयांवर चर्चा करत विस्तृत मार्गदर्शन केले. प्रत्येक समस्यांवर कायदेशीर व प्रशासकीय मार्गदर्शन करत सदर समस्यांबाबत शासन व प्रशासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. लवकरच माथेरान व कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत पक्ष संघटनेबाबत बैठक लावली जाईल असेही रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी अश्वस्त केले.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे थंड हवेचे ठिकाण व ब्रिटिशकालीन नावाजलेले पर्यटन केंद्र असलेले माथेरान हे रायगडच्या शिरपेचातील तुरा आहे. अनेक पर्यावरणविषयक निर्बंधांमुळे व शासकीय-प्रशासकीय अनास्थेमुळे माथेरानमधील पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे. खरंतर माथेरानच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे व वातावरणामुळे अधिक चांगल्या प्रकारे पर्यटन व्यवसाय व पर्यटक संख्या वाढू शकते आणि त्या संदर्भात माथेरानवासियांना शक्य तेवढे सहकार्य करण्याचे व पाठपुरावा करण्याचे शिवसेना संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!