विश्वास निकम
कोलाड : राष्ट्रीय संघर्ष समिती रायगड तसेच रोहा तालुका संघर्ष समिती (EPS-९५) तसेच कहाने राजगुरू नगर व घाडगे पुणे यांच्या वतीने पेन्शनर्सना कमीत कमी ७५०० रुपये पेन्शन, महागाई भत्ता व पेन्शनरला मोफत औषधोपचार मिळावा अशा मागणीसाठी रायगड जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी रायगड यांना गुरुवार, दि. ३ एप्रिल २०२५ रोजी निवेदन देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष मालू पाबरेकर, उपाध्यक्ष सुरेंद्र आगरकर, सचिव देवराम कर्नेकर, खजिनदार नंदकुमार भादेकर, सदस्य नारायण पिंगळे, दगडू बामुगडे, वसंत शेलार, सल्लगार रोहा संघर्ष समिती यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन देण्यात आले.
ठाणे मतदार संघातील खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेच्या अधिवेशनात EPS-९५ पेन्शन संदर्भात मुद्देसूदपणे पेन्शनर्सच्या मागण्या मांडल्या. यामध्ये कमीतकमी ७५०० रुपये पेन्शन, महागाई भत्ता तसेच पेन्शनला मोफत औषधोपचार मिळावा अशी मागणी चालु अधिवेशनात मांडली गेली. गेली ९ वर्षांपासून संघर्ष समिती या मागाण्यांचा पाठपुरवठा करीत आहे. या मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्या असे आवाहन संसदेमध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी केले. याबद्दल शनिवार, दि. २५ मार्च रोजी आनंदश्रम येथे जाऊन त्यांचा संघर्ष समितीतर्फे सत्कार करुन आभार मानले. यावेळी ठाणे संघटनेचे सचिव देशपांडे, देशमुख, शिंदे, मराठे, नवीमुंबईचे अध्यक्ष विनायक तेंडुलकर उपस्थित होते.