अनंत नारंगीकर
उरण : उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे दिलासा मिळत आहे. त्यात उरण तालुक्यात वातावरण काहीसे ढगाळ असताना शुक्रवारी दुपारी चिरनेर, दिघाटी, साई, कळंबुसरे, मोठे भोम परिसरात धुळीचे वादळ सद्दश्य परिस्थिती निर्माण झाली. हवेमध्ये प्रचंड धुळीचे कण पसरल्याने रस्त्यावरुन चालताना नागरिकांना, वाहनचालकांना यांचा त्रास सहन करावा लागला आहे.
इंद्रायणी डोंगर माथ्यावर श्री एकवीरा देवीचा उत्सव सोहळा उत्साहात पार पडत असताना मंदिराजवळ उभारण्यात आलेला मंडप वादळी वाऱ्यात कोसळण्याची घटना घडली. देवीच्या आशिर्वादाने भाविक थोडक्यात बचावले आहेत.
