विनायक पाटील
पेण : रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओग्राफर्स असोसिएशनशी सलग्न असलेल्या अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्यावतीने बैलगाडी शर्यतीची छायाचित्र स्पर्धा संपन्न झाली. गुढीपाडव्याला डॉ. सचिन राऊळ आणि राकेश राणे यांनी नागाव येथिल साताड बंदरात बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. या शर्यतीची छायाचित्र स्पर्धा अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्यावतीने घेण्यात आली होती.
सदर स्पर्धेचा निकाल नुकताच चेंढरे ग्रामपंचायतच्या सभागृहात जाहीर करण्यात आला. स्पर्धेत तब्बल 48 छायाचित्रकार सहभागी झाले होते. या स्पर्धेचे परीक्षण सानपाडा-नवी मुंबई येथिल प्रसिद्ध छायाचित्रकार महेंद्र भाईंदरकर यांनी केले. त्यांनी केलेल्या परीक्षणनुसार उदय पाटील यांनी प्रथम क्रमांक, वैभव शिंदे द्वितीय, चैतन्य वाडेकर तृतीय तर अनिरुद्ध वर्तक यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकवले.
विजेत्या स्पर्धकांना स्पर्धेचे प्रायोजक संदीप गायकवाड, स्पर्धेचे परीक्षक महेंद्र भाईंदरकर, रायगड फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर भायदे, उपाध्यक्ष समीर मालोदे, सचिव आनंद निंबरे, खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे यांच्या हस्ते रोख रक्कम रुपये 5000, 3000, 2000 आणि 1000 व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राकेश दर्पे, सचिव विकास पाटील, सहसचिव अमोल नाईक, खजिनदार विवेक पाटील, सहखजिनदार प्रणेश पाटील, सुबोध घरत, अमर मढवी, सुदेश माळी, निलेश दुदम, जितू शिगवण, सचिन आसरानी, अतुल वर्तक यांनी विशेष परिश्रम घेतले.
