10 ग्रामपंचायतीचा क्षयरोगमुक्त म्हणून गुणगौरव
प्रतिनिधी
तळा : सोमवार, दि. ७ एप्रिल २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय तळा अंतर्गत तळा येथे क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये क्षयरोग मुक्त नामांकन प्राप्त झालेल्या ग्रापंचायतींना पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

तळा तालुक्यातील 25 ग्रामपंचायत पैकी 10 ग्रामपंचायतीचा क्षयरोगमुक्त म्हणून गुणगौरव करण्यात आला. त्यामध्ये तळेगांव, उसर खुर्द, बोरघर हवेली, सोनसडे, काकडशेत, फळशेत कर्नाळा, वाशी हवेली, माजगाव, पन्हेली या ग्रामपंचायतना कांस्य पदक तर पिटसई या ग्रामपंचायतीस रौप्य पदक देण्यात आले. सदरील कार्यक्रमास गटविकास अधिकारी महादेव शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वंदन कुमार पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोधे, डॉ. होणसंगडे, डॉ. वडकुथे, औषध निर्माण अधिकारी निलेश कार्लेकर, आरोग्य सहाय्यक तालुका आरोग्य कार्यालय तळा, प्राथमिक आरोग्य केंद्र तळा, STLS, STS, BCM, PMW, BF, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक, सरपंच, आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
